आणि डाॕक्टर जीव तोडून सांगत असतात. असं काजळ वगेरे लावू नये. तरिही
अंत्यत घातक काजळी पासून तयार होणारे काजळ बाळाच्या नाजूक डोळ्यात आणि गालावर कपाळावर लावालं जातं.
जगाचा समाजशास्त्रीय अभ्यास करताना हे लक्षात आलय फक्त भारतातच असे दृष्ट होवू नये म्हणून अज्ञानी प्रयोग केले जातात.
बाळाला काजळ लावणे ,गंडे दोरे ताईत बांधने दृष्ट काढणे हे ही भित्र्या मानसीकतेचेच प्रकार.
सजिवांची काळजी अश्या चुकिच्या प्रकारे घेतली जातेच
पण निर्जीव वस्तूनाही लिंबू मिरच्या ,बिब्बे बाहूली बांधून काळजी??? घेतात. गाडीला,घराला अश्या वस्तू बांधल्या जातात.
कधिही आपण आपल्या मनाला हा प्रश्न विचारत नाही की खरंच अश्यानी काही बदलत असेल. अज्ञानी लोक याचे शिकार आहेतच पण आगदी
उच्चशिक्षीतही याचे शिकार आहेत. ज्यांच्या हातात या राष्टाचे भवितव्य आहे असे शिक्षक,शासकीय अधिकारी,राजकीय नेते, आरोग्य
जपणारे डाॕक्टर, उद्योजक सारेच याचे शिकार आहेत.
पुर्वीच्य काळी अरोग्याची पेटी ,माळ ,असणारे लिंबू मिरची
आता भुताखेताचा उतारा झालेत.
मानव सोडून इतर कोणताही प्राणी असल्या भयगंडात अडकलेला नाही. पण भारतीय अंधश्रद्धाळू मात्र अति शहाण्यांचा..... म्हणतात ना तसा प्रकार आहे.
कोहोळा बांधने नारळ ,लिंबू बाधने केवळ अज्ञानांचे वा केवळ चिकीत्सा नकरण्याचे, आपलं डोक नवापरण्याचे प्रयोग आहेत.
खरंत आपली मुल आपल कुटूंब संस्कार क्षम अरोग्यदायी असण्या साठी सुजान पालकत्वाचे धडे प्रत्येकाने घ्यायला हवेत. पण घडतं वेगळच. लाडातला आणि खर्या प्रेमातला फरक कळवून घेतला पाहीजे, तिट लावून रक्षण ??,
करण्या पेक्षा संस्कार देवून शहाण करण गरजेच आहे.
मुलांचे अरोग्य ,त्यांच शिक्षण ,हे पाहण गरजेच आहे.
घरातील वातावर खेळीमेळीच रहाव, नात्यान मध्ये विश्वास असावा ,सुसंवादाने सगळे प्रश्न चटकन सुटतात हे ध्यानात घ्यावं.
पण आपल्या देश्यात सगळ विपरीतच घडतय.खुप अस्वस्थ करणार.
Recommended Articles

Varsha Rao
👍