rogmidan chachani

rogmidan chachani

14 Apr 2022 | 1 min Read

Tinystep

Author | 2578 Articles

गरोदर असतानाचे दिवस म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ ! तुमच्या उदरात एक गोड गुपित वाढत असते आणि तुम्हाला त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम असायला हवी असते. गर्भधारणेच्या या काळात कित्येक गोष्टी तुमच्या साठी नवीन आणि गोंधळात टाकणाऱ्या असतात. खाण्यावरची असंख्य बंधने, आहाराचे तक्ते (डाएट  चार्ट्स ) आणि डॉक्टरांकडे जाऊन कराव्या लागणाऱ्या एक ना अनेक तपासण्या.  कित्येकदा, इतक्या साऱ्या तपासण्या समजून घेणे आणि त्यांत फरक करणे कठीण होऊन बसते. डायग्नोस्टिक टेस्ट आणि स्क्रिनिंग टेस्ट यांत नेमका फरक काय, असा प्रश्न अनेक गर्भवती स्त्रियांसारखाच तुम्हालाही पडला असेल.हा लेख वाचून तुमच्या सर्व शंकांचे समाधान होईल.

स्क्रिनिंग टेस्ट्स :

बहुतेक सर्वच गरोदर मातांची स्क्रिनिंग टेस्ट केली जाते. या तपासणीचा उद्देश म्हणजे पोटातील बाळाला असू शकणाऱ्या आजाराच्या लक्षणांचा शोध घेणे. कोणत्याही चिरफाडी विना केल्या जाणाऱ्या या तपासण्या अचूक असतात तसेच बाळ आणि आई दोघांसाठी सुरक्षित ही  ! या तपासण्यांतून बाळाच्या आरोग्या बद्दल तुम्हाला बराच दिलासा मिळू शकतो.

बाळाच्या जन्मापूर्वी केल्या जाणाऱ्या नवकेल ट्रान्स्ल्यूसन्सी स्क्रिनिंग टेस्ट, लेव्हल २ अल्ट्रासाऊंड, ईनिशियल ब्लड वर्कअप, नॉनएनवेनसिव प्रीनॅटल टेस्ट आणि क्वाड टेस्ट या स्क्रिनिंग टेस्ट मध्ये आईच्या रक्ताचा नमुना किंवा अल्ट्रासाउंड चाचणीद्वारे बाळामध्ये काही अनुवांशिक आजार जसे कि डाऊन सिंड्रोम, मज्जासंस्थेशी निगडित स्पायना बिफीडा आहेत का याची शक्यता तपासली जाते.

खरे तर या आजारांचे निदान होत नसले तरी भ्रूणाला असू शकणाऱ्या अनुवांशिक आजाराची पडताळणी ८०% ते ९०% पर्यंत अचूकतेने या स्क्रीनिंग टेस्ट द्वारे केली जाऊ शकते. सोप्या आणि सुरक्षित असणाऱ्या या तपासण्यामधून आजाराची शंका तसेच आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या इतर बाबींची कल्पना स्पष्ट होते.

रोगनिदान चाचणी  (डायग्नोस्टिक टेस्ट) :

सर्व गरोदर मातांसाठी स्क्रिनिंग टेस्ट गरजेची असते तर ज्यांच्या स्क्रिनिंग टेस्ट मध्ये काळजी करण्यासारख्या गोष्टी समोर येतात अशाच गरोदर मातांची डायग्नोस्टिक टेस्ट केली जाते. या चाचणीतून आजाराचे  निदान केले जाऊ शकते. स्क्रिनिंग टेस्ट पेक्षा खूप वेगळ्या असणाऱ्या या निदानात्मक चाचण्या जसे कि, कोरीओनिक व्हिलास व्हीलस सॅम्पलिंग (CVS ) आणि अमिनो सिंटेसिस द्वारे बाळाच्या नाळेतील पेशी किंवा गर्भाशयातील द्रवाचे परिक्षण करतात. यामुळे यात जास्त अचूकता असते  आणि गुणसूत्रांतील दोषांमुळे होणाऱ्या डाऊन सिंड्रोम आणि मेंदूविकारांचे,इतर व्यंगांचे ही  निदान खात्रीलायक पणे  होते.

पक्के निदान आणि अचूकता यामुळे या चाचण्या थोड्या महाग असतात.

काही विशिष्ट परिस्थितीत, तुमचे डॉक्टर तुम्हाला स्क्रिनिंग टेस्ट ऐवजी रोगनिदानात्मक चाचण्या अगोदर करवून घेण्याचा सल्ला देतील. खास करून जेव्हा तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटूंबात अनुवांशिक आजार असतील, तुमच्या या आधीच्या मुलात गुणसूत्रीय आजार असेल किंवा तुम्हाला काही संक्रमण, हानिकारक पदार्थाचा संपर्क झाला असेल तर अशा परिस्थितीत तुमच्या बाळाला धोका असण्याची शक्यता असते. दुसऱ्या मातांनाही ह्या माहितीचा लाभ होण्यासाठी लेख शेअर करा.    like

0

Like

bookmark

0

Saves

whatsapp-logo

0

Shares

A

gallery
send-btn
ovulation calculator
home iconHomecommunity iconCOMMUNITY
stories iconStoriesshop icon Shop